बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Aryan khan : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट समोर, एनसीबीची आर्यनला क्लिन चीट

मुंबई | राज्यासह देशातील सिनेसृष्टीला हादरवून टाकणारं प्रकरण महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये घडलं होतं. अर्यन खान (aryan khan drugs case) प्रकरणानं सर्वत्र बाॅलिवूडची नाचक्की झाली होती.

एनसीबीच्या कारवाईत एका क्रुझवर ड्रग्ज पार्टीचा (drugs) मोठा खुलासा एनसीबीनं (NCB) केला होता. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी या कारवाईचं नेतृत्व केलं होतं.

एनसीबीनं क्रुझवर छापा टाकत प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. तेव्हापासून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात हे प्रकरण गेलं होतं. आता या प्रकरणी एनसीबीची आर्यनला क्लिन चीट दिल्याची माहिती समोर आलीये.

दरम्यान, एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि महककडे ड्रग्ज सापडलं नव्हतं. याआधीहीआर्यन खानकडं कसल्याही प्रकारचं ड्रग्ज आढळलं नाही. आर्यन खान प्रकरणात चॅटमध्ये कसलंही कटकारस्थान आढळलं नसल्याचं न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये नमुद करण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! भाजप नेते नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल

शिवसेनेनं पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

…म्हणून मी निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नाही- संभाजीराजे छत्रपती

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती- संभाजीराजे

कोरोना पूर्णपणे गेलेला नाही तो पुन्हा वाढतोय, मास्क घालत रहा- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More