बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणी मोठी अपडेट समोर!

पुणे | पुण्यातील कुख्यात गुंड आप्पा लोंढे याच्या खून प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उरुळी कांचन येथे झालेल्या आप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव याच्यासह सहा जणांना शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी 5 मे रोजी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

आप्पा लोंढे खून प्रकरणी झालेल्या सुनावणीत आरोपी गोरख बबन कानकाटे यांचेसह 9 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

कलम 120 ब (कट रचणे) आणि 302 (खून करणे ) या कलमांखाली आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली.

दरम्यान, लोंढे याचा 28 मे 2015 मध्ये उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे रस्ता भागात गोळ्या घालून आणि शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या – 

रवी राणांना पाहताच नवनीत राणांना अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ

कॅच पकडताना रविंद्र जडेजाला मोठी दुखापत, पाहा व्हिडिओ

“भीमा कोरेगाव हिंसाचाराला फडणवीस सरकार जबाबदार”

“जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत….”; भाजप खासदाराचा गंभीर इशारा

मोठी बातमी ! तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणा रुग्णालयात दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More