बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही…’; महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | लसीचे दोन्ही डोस घेऊनही जवळपास वीस टक्के लोकांच्या शरीरात अँटिबॉडिज तयार झाल्या नसल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या नव्या माहितीमुळे आता बूस्टर डोसची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याबाबत द न्यू इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने सविस्तर माहिती दिली आहे.

काही लोकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण हे 30 ते 40 हजार आहे. हेच प्रमाण 60 ते 100 च्या दरम्यान असते तर संबंधित व्यक्ती अँटिबॉडी पॉझिटिव्ह आहे, असं आपण म्हणू शकलो असतो. मात्र ज्या लोकांमध्ये अँटिबॉडीजचे प्रमाण हे तीस ते चाळीस हजारांमध्ये आहे ते अँटिबॉडिज निगेटिव्ह आहेत, असं भुवनेश्वर येथील इंस्टीट्यूट ऑफ लाइफ सायंन्सचे संचालक डॉ. अजय परिदा यांनी अँटिबॉडीजविषयी अधिक माहिती दिली आहे. नव्या माहितीमुळे आगामी काळात लवकरच बूस्टर डोसला परवानगी मिळू शकते असा अंदाजही व्यक्त केला जातोय.

भुवनेश्वर येथील इन्स्टीट्यूट इंडियन ही संस्था SARS-CoV-2 जीनोम कंसोर्टियमचा एक भाग आहे. SARS-CoV-2 जीनोम कंसोर्टियममध्ये (INSACOG) देशभरातील 28 प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूवर अभ्यास केला जातो. या सर्व प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूचे जीनोम सिक्वेंसिंग केली जाते, असंही डॉ. अजिय परिदा म्हणाले.

या संस्थेच्या रिपोर्टमध्येही ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत त्यांच्या शरीरात अँटिबॉडीची पातळी चार ते सहा महिन्यांनी कमी होत गेल्याचं आढळून आलं, असं सांगण्यात आलंय. ज्या लोकांच्या शरारीत अँटिबॉडीजची संख्या निगेटिव्ह किंवा कमी आहे, त्या लोकांना बूस्टर डोसची गरज आहे, असंही अजय परिदा यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं अक्षय कुमारला पत्र, म्हणाले…

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी!

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

“…अन्यथा राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More