लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर, डाॅक्टर म्हणतात…
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून गानकोकिळा लता मंगेशकर प्रकृती अस्वस्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात उपचार घेत आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करा, असं डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचीही माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यातच आता लता मंगेशकर यांच्या आरोग्याविषयी मोठी माहिती मिळत आहे.
लतादीदी अजूनही आयसीयूमध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याव्यतिरिक्त काही सांगू शकत नाही, असं डॉ. प्रतीत समदानी यांनी म्हटलं आहे. 92 वर्षीय लता मंगेशकर यांना 8 जानेवारी 2022 रोजी कोरोना संसर्ग झाल्याने ब्रीच कॅंडीरूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी लतादिदींना 10 किंवा 12 दिवस रूग्णालयामध्ये राहावं लागेल , असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्यापही लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होताना दिसत नाही.
लतादिदींची प्रकृती स्थिर आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा, असंही डॉ. प्रतित समदानी यांनी म्हटलं आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार लतादिदींच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत. सध्या संपुर्ण देश लतादीदींसाठी प्रार्थना करत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्या प्रकृती विषयी काही अफवा देखील पसरवल्या जात आहेत. समाज माध्यमांवर रोज काहीतरी नवीन अपडेट्स दिले जात आहेत. मात्र, त्यावर विश्वास ठेवू नका. खोट्या बातम्या पसरवणे थांबवा, असं लता मंगेशकर यांच्या ट्विटरवरून सांगण्यात आलं होतं.
थोेडक्यात बातम्या-
“…त्यानंतर विराटने लग्न करायला पाहिजे होतं”, शोएब अख्तरने किंग कोहलीला डिवचलं
नवाब मलिक यांचा खळबळजनक दावा म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे युतीमधून…”
नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं! फक्त 30 मिनिटात जमवले 10 लाख अन्…
सतत आजारी पडताय? मग आहारात करा ‘या’ तीन गोष्टींचा समावेश
राज्यातील ‘या’ भागात थंडीची लाट येणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज
Comments are closed.