बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डेल्टा व्हेरिएंटविषयी संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली | कोरोनानं गेल्या दोन वर्षापासून जगभरात हाहाकार माजवला आहेे. सध्या या कोरोनाच्या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिम राबवल्या जात आहे. मात्र अद्यापही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे सगळीकडे चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. आता या चिंतेत आणखी एक भर पडली आहे.

कोरोनानंतर अनेक वेगवेगळे व्हेरिएंटनं समोर येत थैमान घातलं आहे. यातलाच एक व्हेरिएंट म्हणजे डेल्टा व्हेरिएंट. डेल्टा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असून यामुळे बाधित रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होते. अशातच आता ब्रिटनमधील संशोधनातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना लस घेतलेल्या लोकांकडूनही डेल्टा व्हेरिएंट पसरण्याचा धोका आहे, असं ब्रिटनमधील संशोधनातून समोर आलं आहे. कारण कोरोना लस घेतलेल्या लोकांनाही डेल्टा व्हेरिएंट होण्याचा धोका आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्यांमार्फत हा संसर्ग पसरु शकतो, असं यूकेमधील इम्पीरियल काॅलेज लंडनच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे.

दरम्यान, या नवनवीन कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटमुळे संभाव्य तिसरी लाट लवकरच येईल याची शक्यता निर्माण झाली आहे. फक्त देश नाहीतर विदेशातही या डेल्टाचा प्रभाव पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –  

T20 World Cup: पाकिस्तानची जोरदार हॅट्रिक, अफगाणिस्तानवर 5 विकेट्सनं मिळवला विजय

संपुर्ण राज्यात गाजत असलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आज सुरूवात

‘यावेळी गद्दारी सहन करणार नाही’, नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना भर सभेत खडसावलं

आता ‘या’ प्रवाशांना मिळणार लोकल प्रवासाची मुभा; राज्य सरकारची मागणी झाली मान्य

‘त्याच्या उत्पन्नातून एसटी महामंडळ चालु शकते एवढं त्याने कमावलंय’, राणेंचा पुन्हा एकदा वार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More