‘पुण्यात भाजपकडून पैशांचा पाऊस’; धक्कादायक माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी खळबळजनक दावे केले आहेत.

निवडणुकीत पोलिसांच्या मदतीने पैशांच वाटप केलं जात आहे, असा आरोप रविंद्र धांगेकर (Ravindra Dhangekar) यांच्याकडून करण्यात आला आहे.

कसबा मतदार संघातील रविवार पेठ, गंज पेठ या सारख्या आदी भागात भाजपने पैशांचे वाटप सुरू केले असून या संपूर्ण प्रकारात पोलिस देखील सहभागी असल्याचे धंगेकर यांचे म्हणणं आहे.

पुण्यात पैशांचा पाऊस पडतोय. भाजपतर्फे लोकांना पैसे वाटले जात आहेत. पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी केली. काल मी एका पोलीस अधिकाऱ्याला भेटलो. तो हतबल होता. पण आज जनतेसमोर मला हे बोलावच लागेल, असं रवींद्र धंगेकर म्हणालेत.

दरम्यान, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच मतदान उद्या होणार आहे. कसब्यातील जवळपास 270 बूथ वरती मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी कसब्यामध्ये आणि चिंचवड मध्ये दाखल झालेले आहेत.

कसब्यातील प्रत्येक बुथवर लावले जाणारे Evm यंत्रणा त्या त्या केंद्राला वाटप करण्याचं काम सध्या सुरू आहे. जवळपास 1700 पोलिसांच्या बंदोबस्तात ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-