बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्हाट्सअॅपचा मोठा दणका! भारतातील ‘तशा’ वापरकर्त्यांची खाती केली बंद

नवी दिल्ली | सोशल मीडियावर नेहमी अपायकारक गोष्टी घडत असतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन सोशल मीडिया कायदा लागू झाला आहे. या कायद्याने  कोणत्याही समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह गोष्टी आढळुन आल्या तर त्यावर कार्यवाही होत आहे. अशाच प्रकारे व्हाट्सअॅपने ही अशीच कार्यवाही केली आहे.

भारत हा मोठ्या प्रमाणात व्हाट्सअॅप वापरणारा देश आहे. व्हाट्सअॅपने जुन आणि जुलै या महीन्यात भारतीय वापरकर्त्यांच्या विरोधात मोठी कार्यवाही केली आहे. 30 लाख 27 हजार पेक्षा अधिक अपायकारक खाती ही बंद करण्याचा  निर्णय घेतला आहे. ही कार्यवाही जुन 15 ते 31 जुलै या कालावधीत केली आहे.

व्हाट्सअॅपने आपली नवीन नियमावली अंमलात आणण्यासाठी तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. व्हॉट्सअॅपने परेश बी लाल यांची भारतात तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. परेश बी लाल यांनी  व्हाट्सअॅप नियमावलीची कडक अंमलबजावणी केली आहे.

दरम्यान, अपायकारक माहिती, सामाजिक संतुलन बिघडवण्यासारख्या गोष्टी, चुकीची माहिती, व्यक्तींचा त्रास होत असेल, या माहीतीच्या आधारे ही कार्यवाही केली जात आहे. 1800-212-8552  या अधिकृत नंबर वर काॅल करून तुम्ही तक्रार करू शकता किंवा थेट परेश बी लाल यांच्याकडे तक्रार करू शकता.

थोडक्यात बातम्या-

…अन् मुलाने थेट कानशिलात लगावली; लखनऊ मुलीच्या व्हिडीओनंतर ‘या’ व्हिडीओचा धुमाकूळ

“मी एक भारतीय मुस्लीम, मला शासन असलेल्या धर्माची गरज नाही”

तालिबाननं काबूल विमानतळ केलं बंद; नागरिकांची देश सोडण्यासाठी धावाधाव

सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणी सस्पेंस वाढला! झोपेआधी घेतलेल्या गोळ्यांनी केला घात?

पुलावरुन जाताना गाडीने घेतला टर्न अन् झालं भलतच; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More