बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron विषाणू कितीकाळ जीवंत राहू शकतो?, अभ्यासातून महत्त्वाची माहिती आली समोर

नवी दिल्ली | दक्षिण आफ्रिकेतून समोर आलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं जगाची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनचं उपरूप भारत आणि जगातील काही देशांमध्ये आढळून आलं आहे. त्यातच आता ओमिक्रॉन विषाणू किती वेळ जीवंत राहू शकतो, याबाबत अभ्यासातून मोठी माहिती समोेर आली आहे.

कोरोना व्हायरसच्या यापूर्वीच्या व्हेरियंटंपेक्षा ओमिक्रॉन व्हेरियंट जास्त काळ जीवंत राहत असल्याचं समोर आलं आहे. एका अभ्यासानुसार कोरोनाचा नवीन ओमिक्रॉन व्हेरियंट त्वचेवर 21 तास तर प्लास्टिकवर 8 दिवसांपेक्षा जास्त काळ टीकू शकतो. जपानमधील क्योटो प्रीफेक्चर युनिव्हर्सिटीतील मेडिसिनच्या संशोधकांनी यावर काही प्रयोग केले आहेत.

SARS-Cov-2 वुहान स्ट्रेन आणि अन्य कोरोना व्हेरियंट्सचे वातावरण स्थिरतेमधील फरकाचे विश्लेषण करण्यात आले. प्लास्टिकच्या पृष्ठभागावर विषाणूचा जगण्याचा वेळ तपासण्यात आला. त्यामध्ये मूळ अल्फाचा 56 तास, 191 बीटा आणि गामाचा 59 तसेच डेल्टा व्हेरियंटचा 114 तास इतका जीवंत राहण्याचा काळ आहे. यामध्ये ओमिक्रॉनचा सर्वाधिक म्हणजेच 193 तास इतका आहे.

दरम्यान, त्वचेवर व्हायरस जगण्याच्या वेळेमध्ये अल्फा 19 तास , बीटा 19.6 आहे. तर डेल्टा व्हेरियंट त्वचेवर 16 तास जीवंत राहतो. यामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट त्वचेवर जीवंत राहण्याचा कालावधी सर्वांत जास्त आढळला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट त्वचेवर तब्बल 21 तास जीवंत राहतो. जगभरात ओमिक्रॉन व्हेरियंटची वाढणारी संख्या चिंतेचा विषय आहे, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“‘मद्य’राष्ट्र बनविण्यसाठी नेमकी कोणाशी डील झाली?”; फडणवीसांचा सरकारवर घणाघात

नवजोत सिंह सिंद्धूच्या अडचणी वाढल्या, बहिणीनेच केले ‘हे’ गंभीर आरोप

लसीकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती; आता नाकावाटेही घेता येणार कोरोना लस

Pro Kabaddi Leauge: पुणेरी पलटणनं नोंदवला सलग तिसरा विजय

‘…सगळ्यांनी मिळून हे षडयंत्र रचलं होतं’; 12 आमदार निलंबनप्रकरणी फडणवीसांचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More