मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यामुळं राज्यासह देशाचं वातावरण ढवळून निघालं आहे. सध्या या प्रकरणात 116 जण अटकेत आहेत. प्रत्येकाच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत आहेत. अशातच एक खळबळ माजवणारी माहिती समोर येत आहे.
शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याप्रकरणी अटकेत असलेल्या 11 जणांच्या रक्तात अल्कोहोल आढळून आलं आहे. परिणामी सर्वत्र खळबळ माजली आहे. 8 एप्रिलला घटना घडली त्याअगोदरच्या दिवशी 7 तारखेला गुणरत्न सदावर्तेंच्या घरी एक गुप्त बैठक झाल्याचं देखील समोर आलं आहे.
सदावर्तेंच्या घरी 20-25 जण उपस्थित होते. परिणामी आता मुंबई पोलीस या प्रकरणात अधिक खोलात जाऊन तपास करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर आणखीन काही ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानं आता सदावर्तेंना कुठे हलवण्यात येतं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्य पोलीस दलावर सर्वस्तरातून टीका करण्यात आली होती. परिणामी मुंबई पोलीस तपास अधिक वेगानं करत आहेत.
थोडक्यात बातम्या –
“अंगावर शाॅल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब होत नाही”
IPL 2022: CSKला मोठा धक्का! धडाधड गडी टिपणारा ‘हा’ स्टार गोलंदाज संघाबाहेर
“राज ठाकरे हे मराठी ओवैसी, ते फक्त हिंदूंना भडकवतात”
मोठी बातमी! जयश्री पाटलांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू
दोघात तिसरी! लग्नात नवरदेव मैत्रिणीला बोलत बसला अन् नवरीनं केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ
Comments are closed.