बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाबच्या राजकारणात मोठा भुकंप! सिद्धूंच्या राजीनाम्यानंतर ‘या’ 4 बड्या नेत्यांचा राजीनामा

चंदिगड | पंजाबच्या राजकारणात सध्या राजकीय भुकंप होत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाब काॅंग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली. त्यानंतर चन्नी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. पंजाब काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर सिद्धूच्या समर्थनासाठी अनेक नेत्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.

नवज्योतसिंग सिद्धूूबरोबर नव्याने कॅबिनेट मंत्री बनलेल्या रझिया सुल्ताना यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. तर काॅंग्रेसचे सरचिटणीस योगेंद्र धिंग्रा यांनीही राजीनामा दिला आहे. त्याशिवाय काॅंग्रेसचे राज्य कोषाध्यक्ष गुलजार इंदर चहल हेही राजीनामा देेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इंदर चहल हे सिद्धूचे अगदी जवळचे मानले जातात. या नेत्यांबरोबर काॅंग्रेसेचे इतर नेतेही राजीनामा देणार असल्याचं समजत आहे.

सिद्धू हे तत्वनिष्ठ व्यक्ती आहेत. ते पंजाब आणि पंजाबच्या नागरिकांसाठी लढत आहेत, असं मत रझिया सुल्ताना यांनी व्यक्त केलं आहे. रविवारी झालेल्या चन्नी यांच्या मंत्रिमंडळात सुल्ताना यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावर रझियाचे पती मुहम्मद मुस्तफा यांनी जे सध्या राज्याचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी रझिया सुल्ताना यांच्या राजीनाम्यावर अभिमान व्यक्त केला आहे.

दरम्यान,  काॅंग्रेसच्या या नेत्यांनी राजीनामा दिल्यामुळे पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी सध्या परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. काॅंग्रेसच्या सर्व नेत्यांशी बोलून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पंजाबमधील राजकीय घडामो़डीकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरेंनी यांना सरकारमध्ये घेतलं तेव्हा मेलेले जिवंत झाले”

MPSC चा निकाल जाहीर! प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, तर मुलींमध्ये मानसी पाटील

अनिल परबांनंतर शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या अडचणी वाढल्या

अखेर कन्हैय्या कुमारांची राहुल गांधींना साथ, काँग्रेसमध्ये केला प्रवेश!

2021 वर्षाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड महापौर मॅडमना द्यायला पाहिजे- निलेश राणे 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More