बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चंद्राच्या हालचालीमुळे पृथ्वीवर येणार विनाशकारी संकट’; नासाच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली | मागील काही दिवसात समुद्रात मोठ्या हालचाली होताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रात अनेक चक्रीवादळांनी थैमान घातलं होतं. जागतिक तापमान वाढीमुळे अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळांची संख्या वाढत असल्याचं सांगितलं दिसून येत आहे. त्यात आता पृथ्वीवर संकट येणार असल्याची धक्कादायक माहिती नासाच्या अभ्यासातून समोर आली आहे.

हवामान बदलामुळे समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीबरोबरच चंद्राच्या आपल्या कक्षेतील परिवर्तनामुळे किंवा चंद्राच्या हालचालीमुळे पृथ्वीवर विनाशकारी पूर येतील. ही पूरजन्य परिस्थिती 2030 च्या मध्यात अधिक घातक बनेल. अमेरिकेच्या किनारपट्टी भागांत समुद्राच्या लाटा आपल्या सामान्य उंचीपेक्षा तीन ते चार फूट अधिक ऊंच उसळतील. त्यामुळे त्याचा सर्वच देशाच्या किनारपट्टीला धोका असल्याचं नासाच्या अभ्यासातील निष्कर्षातून समोर आलं आहे.

समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीमुळे खालच्या भागांवरील संकट सातत्याने वाढत आहे आणि वारंवार पूर येत असल्याने लोकांच्या समस्याही वाढत आहेत. हवामान बदल एकत्रितपणे जागतिक स्थरावर किनारपट्टी भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण करेल, असं नासाचे व्यवस्थापक बिल नेल्सन यांनी म्हटलं आहे. पूरजन्य स्थिती संपूर्ण वर्षात नियमित राहणार नाही. तर काही महिन्यांदरम्यान ही स्थिती राहील. यामुळे याचा धोका आणखी वाढेल, असं या संशोधनातून समोर आलंय.

दरम्यान, जेव्हा चंद्र आपल्या कक्षेत स्थिती बदलतो, ते पूर्ण होण्यास 18.6 वर्ष लागतात. मात्र, पृथ्वीवरील वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीबरोबरच हे अधिक घातक होते, असं हवाई विद्यापिठाचे असिस्टंट प्रोफेसर फिल थॉम्पसन यांनी म्हटलं आहे. फिल थॉम्पसन यांनी हा महत्वाचं अभ्यास संशोधन लिहलं आहे. प्रसिद्ध जर्नल नेचरमध्ये त्यांचं लिखाण प्रसिद्ध झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

भारतात कोरोनाची तिसरी लाट ‘या’ तारखेपासूनच सुरू झाली, वैज्ञानिकांनी केला धक्कादायक दावा!

‘कोरोना लसीचे डोस मिक्स घेऊ नका’ ; WHO चा गंभीर इशारा

माजी राज्यमंत्र्यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

राज्यात डिसेंबरपर्यंत पोलिस भरती; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा

“संजय राठोडांना विरोध केला तर परिणाम भोगावे लागतील”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More