देश

मुस्लिमांच्या बदनामीचा प्रयत्न होत आहे- ओवैसी

Loading...

हैदराबाद |  सध्या कोरोनाचं प्रचंड मोठं संकट भारतासमोर उभं आहे. अशा परिस्थितीत तबलिकीवरून भारतातल्या मुस्लिम समाजाच्या बदनामीचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. हैदराबादमध्ये ते बोलत होते.

मी मुस्लिम असल्याने मला तबलिकीवरून माफी मागण्याची मागणी केली जात आहे. हिंदु्त्वाचे नाव घेऊन कधी अशा प्रकारे कुणाला निषेध व्यक्त करायला सांगितला का? असा प्रतिसवाल त्यांनी विचारला आहे.

तबलिकी जमातीचे कार्यक्रम यापूर्वीही होत होते परंतू त्यांना आताच बदनाम केले जात आहे. संसदेपासून अयोध्येत राम मूर्ती स्थापनेवेळी लोकांची गर्दी झाली होती. मात्र त्यावेळी सगळे का गप्प होते?, असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, बहुसंख्याकांचा दुटप्पीपणा वारंवार उघडा होत आहे. जर समान संधीच नाही तर समान भागीदारीसाठी विचारणं कसं योग्य आहे?, असंही ते म्हणाले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोना राहू द्या, आधी आव्हाडांपासून वाचवा- निरंजन डावखरे

धक्कादायक! महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाच्या 150 नव्या रुग्णांची नोंद

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या लढ्यात सुनिल गावसकरांकडून 59 लाख रूपये पण मदतीचा गवगवा नाही

358 तहसील आणि 44 हजार गावं तर एका गावाला किती शिवथाळी??; भाजपचा सवाल

“मुंबई अडीच लाख कोटी केंद्राला देते, त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला द्या”

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या