बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात राष्ट्रपतींना खरंच शिक्षकांपेक्षाही कमी पगार मिळतोय?; हे वाचून कळेल वास्तव काय!

नवी दिल्ली | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींना मिळणाऱ्या मासिक वेतनाबद्दल कानपुर येथे आयोजित एका कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, राष्ट्रपतींनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आल्याचं दिसून आलं. राष्ट्रपतींच्या मासिक पगारापेक्षा शिक्षकांना जास्त पगार मिळतो, असं वक्तव्य रामनाथ कोविंद यांनी कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात केलं होतं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वेतनावरून केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मात्र अनेक चर्चा रंगू लागल्या. राष्ट्रपतींच्या वेतनाबद्दल बोलताना रामनाथ कोविंद म्हणाले की,’मला पाच लाख रुपये पगार मिळतो त्यातला पावणेतीन लाख टॅक्स जातो, माझ्यापेक्षा जास्त तर एका शिक्षकाला पगार आहे’.

राष्ट्रपतींच्या पगारामधून खरंच 30 टक्के रक्कम कर म्हणून कापली जात आहे का? याबाबत सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास असं लक्षात आलं की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मासिक पगारामधून 30 टक्के रक्कम ही कराच्या स्वरूपात कापली जात नसून गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही रक्कम स्वेच्छेने दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वेच्छेने 30 टक्के पगाराची रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना मागच्या वर्षीपासून 30 टक्के कमी वेतन दरमहा मिळत आहे. त्याचाच उल्लेख त्यांनी कर म्हणून केल्याने रामनाथ कोविंद यांच्याबद्दल अनेक उलटसुलट चर्चांना सोशल मीडियावर उधाण आल्याचं गेल्या काही दिवसात पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

“…तर मी स्वत: अजितदादांविरोधात तक्रार करेल”

निशाने करण मेहराच्या परिवारावर केला गुन्हा दाखल, धक्कादायक कारण आलं समोर

“राज्य सरकार कोरोनाची दहशत पसरवत जनतेला वेठीस धरून सामाजिक आणीबाणी लादत आहे”

‘विश्वामित्रने ब्रम्हचर्य भंग करून मेनकेशी लग्न केलं हा तसाच प्रकार’; नाथाभाऊंचं फडणवीसांवर टीकास्त्र

मोठी बातमी! कोरोनाबाधित क्षेत्रासाठी 1.1 लाख रुपयांचा निधी; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More