बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम होणार नाही बंद; गुगल आणि फेसबुकची केंद्र सरकारसमोर शरणागती

नवी दिल्ली | गुगल आणि फेसबुकने भारतातील नवे आयटी नियम मान्य केले असून त्या दृष्टीने आपली वेबसाइट अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील भारतात सर्वाधिक वापरले जाणारे फेसबुक, इंस्टाग्राम हे बंद होणार, अशी अफवा पसरली होती. या सर्व चर्चांना आता विराम मिळाला आहे.

गुगल आणि फेसबुक या मोठ्या कंपन्यांनी भारत सरकारने बनवलेल्या नवीन सोशल मीडिया नियमांनुसार तक्रार अधिकारी नेमण्याची प्रक्रिया आणि इतर माहिती सार्वजनिक करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. भारत सरकारने ठरवून दिलेल्या नव्या नियमांनुसार सोशल मीडियावर तक्रार निवारण करण्यासाठी अधिकारी, नोडल अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करणे गरजेचे आहे.

तक्रार अधिकाऱ्याला आलेल्या तक्रारी ह्या 15 दिवसात पूर्णपणे निकाली काढाव्या लागतील. तसेच 24 तासात तक्रार नोंदवण्यासंबंधीची माहिती त्यांना द्यावी लागेल. भारत सरकारने नेमून दिलेल्या नव्या नियमांना दिलेली वेळ उलटून गेल्यानंतरही या बड्या कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर न दिल्याने भारत सरकार आता आपल्या विरोधात गंभीर पावले उचलू शकतं या भीतीने या कंपन्यांनी सरकारच्या नियमांचं पालन करण्याचा निर्णय घेतला असून त्या दिशेने काम देखिल सुरू केलं आहे.

सरकारने 25 फेब्रुवारी 2021 रोजी सर्व नियमांची माहिती संबंधित सोशल मीडिया कंपन्यांना पाठवली होती. तसेच यासंबंधी नियमांचं पालन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देखील दिली होती. पण फक्त कूव्ह या कंपनीने अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे, याशिवाय कोणत्याही कंपन्यांनी अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही.

थोडक्यात बातम्या –

खोटं ओळखपत्र बनवून लसीकरण केल्यासंदर्भात वादात सापडलेल्या अभिनेत्रीने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

साखरपुडा झाल्यानंतर प्रियकराने दिला लग्नाला नकार, प्रेयसीने केलं असं काही की…

महाराष्ट्रात यंदा मान्सूनचं आगमन उशिराने होणार; हवामानतज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

शनिवारी देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; सक्रिय रूग्णसंख्याही घटली

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढली; इंजेक्शनचा साठा अपुरा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More