तंत्रज्ञान देश

उद्या लॉन्च होतोय जबरदस्त फिचरसह रेडमीचा नवा फोन, किंमत असणार फक्त 10 हजाराच्या आसपास!

नवी दिल्ली | शाओमी ब्रँडच्या Redmi या मालिकेतील Redmi 9 Prime फोनचे प्रक्षेपण उद्या भारतात होणार आहे. हा फोन ६ ऑगस्टपासून Amazon Prime Day मध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतातील शाओमीचे व्यवस्थापकीय संचालक आणि जागतिक उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी ट्विटरवरून या फोनची माहिती दिली आहे.

मागच्या महिन्यात या फोनचे लॉन्चिंग चीनमध्ये झाले. तिथे रेडमी ९ मालिकेतील या फोनमध्ये थोडे सुधारित बदल करून नवीन आवृत्तीत उपलब्ध होणार आहे. या फोनची भारतात १०,००० रुपये किंमत असू शकते. या फोनची Realme C11 या फोनशी टक्कर होऊ शकते. ४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता Amazon या ई-कॉमर्स संकेतस्थळावर ‘रेडमी ९ प्राईम’ या फोनचे लॉन्चिंग होणार आहे.

शाओमी कंपनीच्या विविध समाज माध्यमांच्या व्यासपीठावरून या फोनचे प्रक्षेपण होणार आहे. तसेच ई-स्टोर आणि दुकानांमध्येही लवकरच हा फोन विक्रीस उपलब्ध होणार आहे. या फोनची स्क्रीन 6. 53 इंच पूर्ण एचडी प्लस डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच सुविधा असू शकते. याचे रिझोल्युशन १०८०×२३४० पिक्सलमध्ये येऊ शकते.

या फोनचा प्रोसेसर MediaTek असून गेमिंग प्रोसेसर Helio G80 Soc असू शकतो. या फोनमध्ये ऑक्टोकोर प्रोसेसर वापरण्याची शक्यता आहे. ३ जीबी रॅम पर्यायी असू शकते. क्वाड रिअर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच १३ मेगापिक्सेल सेन्सर असू शकतो. या व्यतिरिक्त ८+५+२ मेगापिक्सेल हे अन्य तीन कॅमेरेही दिले जाण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनची बॅटरी 5200 MAh आणि USB Type-C चार्जर तसेच जलद चार्जिंगची सुविधा उपलब्ध असू शकते.

“जगणं राहिलंच, निदान त्याला मरु तरी द्या”

कोरोनाचा धुमाकूळ… देशात गेल्या तासांत तब्बल एवढे हजार कोरोना रूग्ण

मैं हूँ ना…. चिंता करू नकोस, राज ठाकरेंचा अविनाश जाधवांना खास निरोप

लॉकडाऊनमध्ये रॉयल एनफील्डची कमाल, ग्राहकांच्या पसंतीला बुलेटची धमाल…!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या