बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् रिमझिम पावसामुळे इमारत पत्त्यासारखी कोसळली; पाहा व्हिडीओ

जळगाव | सोमवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे जळगावमधील पाचोरा शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. अवघ्या पाच वर्षांपूर्वी बांधलेली एक इमारत पावसामुळे कोसळली आहे. या घटनेचा व्हिडीओ उपस्थितांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता. सध्या हाच व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होताना दिसत आहे.

मुंबईमध्ये वास्तव्यास असणाऱ्या साजेदाबी शेख यांनी पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात पाच वर्षांपूर्वी एका प्रकारची गुंतवणूक म्हणून ही इमारत बांधली होती. मात्र, तांत्रिक दोषांमुळे इमारतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले. शेख यांनी ही इमारत काही भाडेकरूंना दिली होती. परंतु इमारतीला तडे गेल्यानं, त्याचा धोका लक्षात घेता भाडेकरांकडून वेळीच इमारत खाली करून घेण्यात आली होती.

20 सप्टेंबरच्या रात्री पाचोरा शहरात रिमझिम पाऊस चालू होता. पाऊस चालू असताना ही इमारत हळूहळू एका बाजूला झुकू लागली. यानंतर बघता बघता ही इमारत पत्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहे. त्यावेळी अनेकांनी याचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला आहे.

दरम्यान, यावेळी घटनास्थळी अनेक लोक उपस्थित होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहाणी झालेली नाही. या घटनेनंतर आमदार किशोर पाटील यांनी घटनास्थळी जावून लोकांची भेट घेतली आहे. आता येत्या काळात पावसाचं प्रमाण वाढणार असल्यानं लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

पाहा व्हिडीओ –

 

थोडक्यात बातम्या –

सांगा पाहू दबंग कोण?; अमोल मिटकरींनी मांडलं आघाडीचं गणित

पुढील 15 दिवस महत्त्वाचे! गणेशोत्सवानंतर ‘या’ शहरात तिसऱ्या लाटेची शक्यता

‘सोमय्यांच्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही’; दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

“सोमय्यांना पळून जावं लागलं, कोल्हापूरचा ‘पैलवान’ गडी कोणाला ऐकणार नाही”

भारताची ‘व्हॅक्सिन मैत्री’! आता इतर देशांनाही पुरवणार कोरोना लस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More