बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब! केवळ 12 दिवसात तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागलं इंधन; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

नवी दिल्ली | कोरोनामुळं बऱ्याच अडचणी वाढल्या आहेत त्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झपाट्यानं वाढ होत आहे.  गेल्या काही दिवसांपासून वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर सामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. केवळ जून महिन्यात पेट्रोलचे दर जवळपास 2 रुपयांनी वाढले आहेत. या वाढीनंतर देशातील अनेक शहरात पेट्रोलचे दर 105 रुपये प्रति लिटरच्या जवळपास पोहोचले आहेत. मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 102.30 रुपये तर डिझेलचे दर 94.98 रुपये प्रति लिटर आहेत.

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. जूनमध्ये अवघ्या 12 दिवसात पेट्रोलचे दर 1.63 रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर 1.60 रुपये प्रति लिटरने वाढले आहे. रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलत असतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.

दिल्लीत 96.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 86.98 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत 102.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर. कोलकातामध्ये 96.06 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.83 रुपये प्रति लिटर. चेन्‍नईत 97.43 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 91.64 रुपये प्रति लिटर आहे. बंगळुरूत 99.33 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.21 रुपये प्रति लिटर आहे. नोएडामध्ये 93.46 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.46 रुपये प्रति लिटर आहे. जयपूरमध्ये 102.73 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.92 रुपये प्रति लिटर आहे. भोपाळमध्ये 104.29 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.60 रुपये प्रति लिटर आहे. श्रीगंगा नगरात 107.22 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.05 रुपये प्रति लिटर आहे. रीवामध्ये 106.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.65 रुपये प्रति लिटर आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसीएल या 3 तेल कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तुम्ही 9224992249 वर एसएमएस पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

थोडक्यात बातम्या –

पुणे विद्यापीठात फिरायला यायचं असेल तर यापुढे पैसे द्यावे लागणार!

“प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार”

“शरद पवार देशाचे पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल”

“प्रकाश आंबेडकरांना नको तिथे नाक खुपसून प्रसिद्धीत राहण्याची घाण सवय”

“कोरोनातून बरे झालेल्यांना लस देण्याची आवश्यकता नाही”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More