बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अवघ्या तीन वर्षात भाजपला रामराम ठोकत ‘या’ नेत्याने केली काँग्रेसमध्ये घरवापसी

कोल्हापुर | कोल्हापुरातील गोपाळराव पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी काँग्रेसला अलविदा करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या तीन वर्षात भाजपला रामराम ठोकत त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप गोपाळराव पाटलांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा चालू होती. अखेर त्यांनी काँग्रेसचे बडे नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपमध्ये योग्य सन्मान मिळत नसल्याने पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसली. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यातच हे सगळं सुरु असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चंदगड तालुक्यातील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असलेले गोपाळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे.

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोपाळराव पाटील यांना तिकीट देण्यात येईल असं भाजपने आश्वसन दिलं होतं. मात्र ऐनवेळी भाजपने शिवाजी पाटील यांना तिकीट दिलं आणि गोपाळराव यांना दिलेला शब्द मोडला असं त्यांच्या समर्थकांकडून बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या

“आदित्य ठाकरेंनी सांगितल्यानं पब आणि बार बिनधास्त सुरु”

सैन्य भरती परीक्षेचा पेपर फुटला, पोलिसांनी केली ‘ही’ धडक कारवाई

…तर मी थेट राजीनामा दिला असता- सुजय विखे

‘दादांच्या पोटातलं ओठावर आलं’; ‘या’ मुद्दयावरून अजित पवार देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली

आम्ही भिकारी नाही, वाटेल तो संघर्ष करू आणि आमच्या हक्काचं घेऊ- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More