बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकीकडे ठाकरे-फडणवीसांची भेट, तर दुसरीकडे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

सांगली | गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यात पुरग्रस्त भागाचे दौरे करत आहेत. लोकांच्या वेदना, दु:ख समजून घेत आहेत. नुकताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापुरचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये उध्दव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या नेत्यांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात दोन्ही कार्यकर्ते एकमेकांशी सामंजस्याने वागले पण सांगलीमध्ये दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले आहेत.

सांगलीमध्ये हरभट रोडवरील बाजारपेठेत मुख्यमंत्री पाहणी करत असताना भाजप कार्यकर्त्यांनी अचानक गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. बाजारपेठेत बसून ठिय्या आंदोलन सुरू केलं. यालाच प्रतिउत्तर म्हणून शिवसैनिकांनी देखील जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

यानंतर देन्ही गटात बाचाबाची सुरू झाली. पोलिसांनी या प्रकरणामध्ये वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही कार्यकर्त्यांना समजावलं. मुख्यमंत्र्याचा ताफा गेल्यानंतर 15 मिनिट हा गोंधळ सुरूच होता.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आमची निवेदने घेतली नाहीत, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, शिवसैनिकांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांची निवेदने घेतली, असा दावा शिवसैनिकांनी के़ला आहे.

थोडक्यात बातम्या

बाबो! ‘या’ माजी मंत्र्याने केली तब्बल 6 लग्न, पत्नीनेच केला गुन्हा दाखल!

उत्तर प्रदेशमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला फक्त विकास दिसेल- अमित शहा

…याच जिल्ह्यातील दुकानांच्या वेळेत वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!

‘मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार”

लग्नात नवरीने केली धमाकेदार एंट्री, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More