लखनऊ | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नवनिर्वाचित पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या उत्तर प्रदेशच्या ‘रोडशो’मध्ये ‘चौकीदार चोर है’ असे नारे देण्यात आले.
प्रियांका गांधी यांनी यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्याचा हा पहिला रोड शो होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या रॅलीला मोठा प्रतिसाद दिला आहे.
प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्या आजच्या उत्तर प्रदेशमधील रोड शोची चर्चा देशभरात सुरु आहे. या रोड शोमध्येही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
प्रियांकांच्या लखनऊमध्ये येण्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. वाजत-गाजत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांकांचं स्वागत केल्याचं दिसून आलं.
गली गली में शोर है, चौकीदार चोर है।#ChowkidarChorHai #NayiUmeedNayaDesh pic.twitter.com/wrBN0qcqHj
— Congress (@INCIndia) February 11, 2019
महत्वाच्या बातम्या-
–“उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही”
–गडकरीजी, हनुमानाची जात सांगणाऱ्यांना कधी ठोकणार?; काँग्रेसचं गडकरींना आव्हान
–नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान असल्यासारखं वागतात- अरविंद केजरीवाल
–देशसेवेसाठी प्रियांकाला देशाच्या हवाली केलंय…. राॅबर्ट वाड्रांनी लिहिली भावुक पोस्ट
–प्रियांका गांधींच्या एंन्ट्रीमुळं सपा-बसपानं घेतला मोठा निर्णय??