बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेयसीच्या प्रेमात वेडा झाला प्रियकर, केले अत्यंत धक्कादायक कारनामे

लखनऊ | यूपीच्या एका प्रेमवेड्याने त्याच्या प्रेयसीला प्रचंड हैराण करुन सोडलं आहे. सतत काही ना काही धक्कादायक कृत्य करुन हा प्रियकर आपल्या प्रेयसीला त्रास देत असे. तिला कधी रक्ताने माखलेले फोटो पाठवतो तर तेच फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा. तसेच कधी तिच्या घरी जाऊन आत्महत्या करून तिला फसवण्याची धमकी देत असे. संबंधित आरोपीचं नाव मोनीस असं आहे.

आरोपी प्रियकराने एक व्हिडीओ बनवला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटल्याप्रमाणे त्याचं एका मुलीवर प्रेम आहे, तिचंही त्याच्यावर प्रेम आहे आणि त्या दोघांचं लग्न होणार होतं. मात्र काही लोकांना हे आवडलं नाही. या कारणामुळे काही लोकांनी त्याच्या प्रेयसीवर लग्न न करण्याचा दबाव टाकला. सोबतच त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली, असं देखील त्यानं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये आरोपीने पोलिसांनी त्याला मारहाण करुन प्रेयसीला भेटून दिलं नाही, असा आरोप त्याने केला आहे. आपण तिच्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचं देखील त्यानं म्हटलं आहे. यासाठी त्याने मंटू, बिबाल आणि बंटू या व्यक्तींना जबाबदार ठरवलं आहे. व्हिडीओ रेकॉर्ड झाल्यानंतर मोनीसने काही गोळ्या खाल्ल्या.

दरम्यान, संबंधित तरूणी आणि मोनीसचं प्रेमप्रकरण सुरू होतं.  दोघांचं लग्नही होणार होतं मात्र मुलीच्या घरच्या लोकांना समजल्याप्रमाणे मोनीस नशा करतो आणि त्यामुळे त्यांनी लग्न मोडलं. त्यानंतरही मोनीस लग्न करण्याचा हट्ट करत राहिला. त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस”

“भन्नाटच… मला मैदानात असे 11 जडेजा पाहिजेत”

कोरोना ही बिल गेट्सची कल्पना, तो व्हायरस नसून दहशत- बंडातात्या कराडकर

मराठी चित्रपट चालत नाहीत याला मराठी प्रेक्षकच जबाबदार; प्रसाद ओक संतापला

कोरोना झाला, दिवसभर फिरुनही बेड मिळाला नाही; पुण्यातील महिलेची आत्महत्या

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More