बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात नव्या विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘हे’ नवीन नाव चर्चेत

मुंबई | नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. विधानसभेचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली होती. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या यासाठी बैठका सुरु झाल्या आहेत. यामध्ये आता काँग्रेसशिवाय इतर पक्षाकडे पद दिलं जाणार का? याविषयी तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र हे पद काँग्रेसकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रात नव्या विधानसभा अध्यक्षपदासाठी पुण्यातले काँग्रेसचे नेतृत्व आणि भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सध्या चालू आहे. सध्या काँग्रेसमध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे. पण अंतिम निर्णय हा तिन्ही पक्ष मिळूनच घेणार आहे. त्यांच्या नावावर आणखी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोहर लागण्याची आवश्यकता आहे.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी पुण्यात काँग्रेस भवनाची तोडफोड केली होती. संग्राम थोपटे एक पक्षनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्यांंना मंत्रिपद देऊ शकलो नाही. कार्यकर्त्यांना राग आहे. मी संग्राम थोपटेंशी बोललो. त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल, असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता संग्राम थोपटे यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा पाठिंबा काँग्रेसला आहे. याचा पुनरुच्चार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी केला आहे. एकदा का या पदासाठी काँग्रेसने उमेदवार निश्चित केला की, हा विषय वेगाने पुढे सरकू शकेल, असं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“आम्ही 20 वर्षे राष्ट्रवादीत काम केलंय, आताची राष्ट्रवादी शरद पवारांच्या विचारांची राहिली नाही”

“फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच, मराठी माणसाचा जाच तरी संपेल”

“पैसे खाल्ले तेव्हा नव्हता का कोरोना?, उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ”

“पंजा फक्त टायगर जवळच असतो आणि टायगर काँग्रेसमय झालाय”

वाह! घरगुती गॅस सिलेंडरवर 900 रुपयांचा कॅशबॅक; ‘ही’ आहे भन्नाट ऑफर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More