Top News महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका; मृतांची संख्या 52 वर

पुणे | कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशातले सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातली कोरनाग्रस्तांची संख्या ही 800 च्या पार पोहचली आहे.

एकट्या मुंबईत ही संख्या साडे पाचशेच्या वरती पोहचली आहे. तर पुणे पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या ग्रामीण भागातही संख्या वाढताना दिसून येत आहे. पुण्यात 114 कोरोनाग्रस्त असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काही कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी देखील जात आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाने मृत्यू पावणारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 52 लोक मृत्यू पावलेले आहेत. देशाच्या तुलनेत महारष्ट्राचा मृत्यू दर हा खूपच आहे. कारण भारतात आतापर्यंत 111 लोक मृत पावले आहेत. त्या दृष्टीने एकट्या महाराष्ट्रात 25 लोक मृत्यू पावल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे. 14 एप्रिलला संपणारा लॉकडाऊन वाढण्याचे संकेत महाारष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. तर येत्या काळात कोरोनाची लढाई अधिक निकाराची असेल. लोकांनी घरात राहून या लढाईत सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देशात 4 हजारांवर कोरोनाचे रुग्ण तर 109 मृत्यू, 25 हजार तबलिगी क्वारंटाईन

‘आम्हाला पैशांची समस्या नाही तर…’, केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्याच्या लेकीचा मदतीचा हात; गोरगरिबांना देणार स्वत:च्या शेतातली ज्वारी तसंच गरजेच्या वस्तू

माजी पंतप्रधान मोहम्मद जिब्राईल यांचा कोरोनामुळे झाला मृत्यू

… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या