Top News महाराष्ट्र मुंबई

कौतुकास्पद… आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी राज्याच्या जनतेला दिल्या 2 मोठ्या गुडन्यूज

मुंबई |   देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात आहेत. मंगळावारी महाराष्ट्राची कोरोनाबाधितांची संख्या जवळपास 70 हजारांच्या घरात पोहचली आहे. राज्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण देखील वाढत असलं तरी शासन आणि प्रशासनाच्या उपाययोजांना यश मिळत असल्याचं दिसत आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याला दोन मोठ्या गुड न्यूज दिल्या आहेत.

राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढून 43.35 % एवढे झाले आहे.गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. प्रत्येक दिवशी जवळपास 700 ते 800 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहे. आतापर्यंत जवळपास 30108 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 11 वरून 17.5 % दिवसांवर गेला आहे. याचाच अर्थ नव्याने नोंद होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी झाली आहे. प्रथमत: मुंबई, पुणे, ठाणे औरंगाबाद, नाशिक, नागपूरमध्ये कोरोनाबाधितांचा कहर पाहायला मिळाला. मात्र मुंबई सोडता नव्याने नोंद होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील आता कमी व्हायला सुरूवात झाली आहे.

दुसरीकडे राज्य शासन खरबदारीचा उपाय म्हणून मुंबई युद्धपातळीवर कोरोना दवाखाने उभारत आहे. येणारा पावसाळा तसंच मुंबईत कोरोनाचा वाढणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र नेचर पार्कजवळ 15 दिवसांत 200 खाटांचं तसंच बीकेसीमध्ये 40 दिवसांत 1033 खाटांचं अद्ययावत रूग्णालय शासनाने उभं केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात 2361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पाहा तुमच्या भागातील कोरोना रुग्णांचा तपशील

कोरोनाचा पुण्याला दिलासा, मात्र मुंबईत आज धक्कादायक आकडा

गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

महत्वाच्या बातम्या-

जानकरांकडे 30 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या डॉक्टरला यासाठी मिळाला जामीन!

खडकवासल्यातून मलाच उमेदवारी मिळणार होती, मात्र… रुपाली चाकणकरांचा मोठा खुलासा

चित्राताईंनी पक्ष सोडल्यानं प्रदेशाध्यक्षपद मिळालं त्यांचे आभार मानाल का?, चाकणकर म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या