बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात लाॅकडाऊनमध्ये शिथिलता; आता शनिवार-रविवारीही दुकानं राहणार सुरू

पुणे | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लॉकडाऊनची घोषणा केली होती. संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊनही घोषित केला होता. शनिवार-रविवारी मेडिकल स्टोअर्स वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये वीकेंड लाॅकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात असल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आता शनिवार-रविवारीही इतर दिवसांप्रमाणेच अत्यावश्यक सेवेतील दुकानं सुरू राहतील, असं घोषित केलं आहे.

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज कोरोना आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अत्यावश्यक सेवेतील आस्थापना म्हणजेच किराणा दुकान, भाजीपाला विक्री, दूध विक्री, बेकरी यांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत आठवड्याच्या इतर दिवसांप्रमाणेच दुकानं उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीतील आस्थापना शनिवार-रविवारीही सुरू ठेवण्याबाबत मागणी आज आढावा बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. त्यानंतर, अत्यावश्यक सेवेतील आस्थापना शनिवार-रविवारीही सुरू ठेवण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या –

…तर कोविड-बिविड काही बघणार नाही, हा संभाजीराजे सर्वात पुढे असेल- संभाजीराजे भोसले

‘मिर्झापूर’मधील ‘या’ अभिनेत्यावर लाॅकडाऊनकाळात आली रामलड्डू विकण्याची वेळ?

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार; ‘या’ तारखेला येणार नवी नियमावली

‘आम्हाला कोणाच्याही भांडणात रस नाही, किती वर्ष या वर्गाचा वापर करून घेणार?’; संभाजीराजे कडाडले

बोलण्यास नकार दिल्यानं अल्पवयीन मुलीवर ब्लेडनं केले वार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More