बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तेरी मिट्टी में मिल जावां…’; कोरोना योद्ध्यांसाठी जवानाने वाजवली मनमोहक धून, पाहा व्हिडीओ

मुंबई | कोरोनामुळे अनेकांना आपला जवळचा व्यक्ती गमवावा लागला आहे. याच कोरोना काळात डाॅक्टर परिचारिका त्याच बरोबर इतर कर्मचाऱ्यांनी कोरोना लढाईत महत्वाची भूमिका बजावली आहे. देशातील अनेक डॉक्टर, परिचारिका, पोलीस आणि इतर कोरोना वॉरियर्स लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले होते. अशाच कोरोना योद्ध्यांसाठी एका जवानाने एक मनमोहक धून वाजवली आहे.

ITBP जवानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या जवानाचं नाव कॉन्स्टेबल मुजम्मल हक असं आहे. त्याने आपल्या सेक्सोफोनवरुन ‘तेरी मिट्टी में मिल जावां’ ही अतिशय गोड धून वाजवली आहे. कॉन्स्टेबल मुजम्मल हक या जवानाने त्या कोरोना वॉरियर्सचे विशेष पद्धतीनं स्मरण केलं आहे.

कोरोना काळात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील 300 पेक्षा अधिक सैनिक मरण पावले आहेत. या जवानाचा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. कोरोनाचा काळ असो वा इतर कोणतेही संकट भारतीय सैनिक सीमेवर सर्व संकटाचा सामना करत असतात. त्याच बरोबर वेगवेगळ्या गोष्टी शिकत असल्याचं देखील पहायला मिळतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयटीबीपीच्या कॉन्स्टेबल राहुल खोसला याने कोरोना योद्धांना आपल्या मंडोलिनच्या धुनने सलामी दिली होती. त्यांनी ‘हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए’ या गाण्याची धून वाजवली होती. तो व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

बारावीच्या परिक्षेसंदर्भात ‘या’ राज्यानं केली मोठी घोषणा; विद्यार्थी घरबसल्या देणार पेपर

इंडिया VS पाकिस्तान सामन्यावर यंदाही विर्जन; टीम इंडियाची आणखी एक स्पर्धा रद्द

डोळ्यात मिरची पावडर फेकून 19 लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न; 40 CCTV तपासल्यानंतर आरोपी अटकेत

पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता!

लग्नाच्या वाढदिवसाला दिलेला एक किलो सोन्याचा हार निघाला नकली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More