‘… तरी शिवसेनेला 100 हून अधिक जागा मिळतील’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
मुंबई | गेले दोन दिवस विधानसभेत विशेष अधिवेशन पार पडले. त्यात विधानसभा अध्यक्षांची निवड, विश्वासदर्शक प्रस्ताव आणि विरोधी पक्षनेत्याची निवड असे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी दोन दिवस सभागृहात नेत्यांची भाषणे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह अनेकांनी अभिनंदन प्रस्ताव सादर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. आता निवडणुका झाल्या तरी शिवसेनेला 100 हून अधिक जागा मिळतील, असा दावा संजय राऊतांनी केला. तर आम्ही तयार आहोत, असं देखील संजय राऊत म्हणाले.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याभोवतीच्या चार लोकांच्या कोंडाळ्यामुेळे ते बावळट सिद्ध झाले आहेत. त्यांचयामुळे शिवसेनेची ही अवस्था झाली आहे, असं गुलाबराव पाटील कालच्या भाषणात म्हणाले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, ज्या चार लोकांच्या नावे बोटं मोडता, त्या चार लोकांंमुळे तुम्हाला सत्ता मिळाली. ते चार लोक पक्षाचं काम करत होते, आजही करत आहेत, गेली अडीच वर्षे तुम्ही सत्तेत राहिलात, तेव्हा हे चार लोकंच होते. आता त्यांना तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात. पण उद्धव ठाकरे काय दुधखुळे नाही आहेत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वत: चे निर्णय स्वत: घेतात.
दरम्यान, शिंदे गटातील आमदारांवर बोलताना ममता बॅनर्जी यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सर्व आमदारांना केवळ पैसे नाही मिळालेत, त्यांना आणखीही खुप काही मिळाले आहे, ममता बॅनर्जींच्या या वक्तव्याचा उल्लेख देखील राऊतांनी केला.
थोडक्यात बातम्या –
‘शरद पवार म्हणजे काही…’, केतकी चितळे स्पष्टच बोलली
‘एखाद्या सांगाड्यासारखं हे सरकार भाजपच्या रुग्णवाहिकेतून अवतरलं आहे’, शिवसेनेचा घणाघात
‘हिंमत असेल तर…’, उद्धव ठाकरेंचं शिंदे सरकारला आव्हान
तुमच्याकडे असणाऱ्या ‘या’ नोटा बाद होणार, RBI चा मोठा निर्णय
‘…तरीही माझ्यातला शिवसैनिक जिवंत असेल’, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
Comments are closed.