बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! ‘या’ शुल्लक कारणावरून मुंबईत पोलिसाला तृतियपंथीयांकडून मारहाण

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात देखील पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. अशातच आता मुंबईत देखील असाच एक प्रकार घडला आहे. तृतियपंथीयांनी मिळून मुंबईतील एका वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

रस्त्याने चालत जाणाऱ्या एका नागरिकाच्या आणि रिक्षा चालकाच्या भांडणात पडून काही तृतीयपंथी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाशी वाद घालत होते. यावेळी वाहतूक पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी या वादात मध्यस्थी केली. यामुळे या तृतीयपंथीयांनी मिळून वाहतूक पोलिसाला मारहाण केली.

यातील एका तृतीयपंथीयाने स्वत:ची कपडे काढत पोलिसाची कॉलर खेचली आहे. यावेळी घटनास्थळी इतरही पोलीस दाखल झाले. परंतु तृतीयपंथीयांनी त्यांना देखील अश्लील भाषा वापरत धमकी दिली.

गोरेगाव भागातील बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. यानंतर तीन तृतियपंथीयांवर कारवाई करत त्यांना गजाआड टाकण्यात आलं आहे. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या लोकांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

“बाॅलिवूड चित्रपटांमध्ये माझा फक्त फर्निचरसारखा वापर केला”

“बेईमानी करण्याऱ्या काँग्रेस नेत्यांना लाथा घाला, पोलीस केसचं काय ते मी बघून घेईल”

#IPL2021 दोन आक्रमक संघ भिडणार; ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

FD धारकांसाठी मोठी बातमी! ‘या’ 3 बॅंकांनी बदलले एफडीचे व्याजदर

‘चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नाही’; पाटलांच्या टीकेवर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More