Top News नागपूर महाराष्ट्र

…तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा- रामदास आठवले

नागपूर | विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा होत आहे. एकीकडे शिवसेनकडून नेते संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार असल्याचं म्हटलं आहे. अशातच आरपीयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मुंबई महापालिकेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुक आम्ही भाजप आणि आम्ही एकत्र लढणार आहोत. त्यामुळे महापालिका निवडणुक जिंकल्याशिवाय राहणार नसल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. नागपुरमध्ये ते बोलत होते.

शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील मात्र काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जर आम्ही निवडणूक जिंकलो तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा असणार असल्याचं आठवले म्हणाले.

दरम्यान, राज्यात पक्ष विस्ताराचं काम सुरु आहे. जिथे शक्य असेल तिथे आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपसोबत युती करणार आहोत. भाजपने आम्हाला जागा द्याव्यात, अशी मागणीही आठवलेंनी केली.

थोडक्यात बातम्या-

“मन खचून गेले हे बघून….त्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघायला मिळते”

कोरोनाने रायकर कुटुंबाचा केला पुन्हा घात; कुटुंबातील या व्यक्तिचं निधन

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा; फडणवीसांचा सरकारला इशारा

“उद्धव ठाकरे म्हणतात 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू, मग आम्ही काय करायचं”

“देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या