बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत प्रेमीयुगुलाने वृद्ध महिलेचा चिरला गळा, दीड महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर

मुंबई | मुंबईतील भांडूप परिसरात एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती. गेल्या दीड महिन्यांपासून या हत्येचा तपास चालू होता. यातच आरोपी आणि हत्येमागील कारण शोधण्याचा पोलीस अथक प्रयत्न करत होते. अशातच या हत्येचं रहस्य उलगडलं असून एका प्रेमीयुगुलाने ही हत्या केली असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित 70 वर्षीय मृत महिलेचं नाव रत्नाबेन मोहनलाल जैन असून त्या भांडूप पश्चिममधील फुगावाला कंपाऊंट परिसरात एका चाळीतील घरात राहत होत्या. 14 एप्रिल रोजी त्यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेनं रत्नाबेन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं त्यांना आढळलं. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.

रत्नाबेन या सावकारीचा व्यवसाय करत होत्या. त्यामुळे ही हत्या पैशाच्या नाही तर चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. यातूनच या हत्येमागे असलेल्या आरोपी उत्तर प्रदेशातील एका प्रेमी युगुल असल्याचं समोर आलं. ही हत्या कट रचून करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, हत्या झाल्यानंतर आरोपींनी महिलेचे साडे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले होते. पण घरात सुरक्षित ठिकाणी ठेवलेली तीन लाख रुपयांची रक्कम तशीच राहिली होती. दरम्यान पोलिसांनी मृताच्या घरातून एक वही जप्त केली आहे. ज्यामध्ये महिलेनं कोणत्या व्यक्तीला किती रुपये उधार दिलेत याचा हिशोब लिहिलेला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माही’ झाला पुणेकर; पुण्यातील ‘या’ भागात घेतलं आलिशान घर 

मन सुन्न करणारी घटना; नवरा-बायकोच्या भांडणामुळे दोन मुलांना गमवावा लागला जीव

चीनच्या तरूणीने गायलं ‘हे’ हिंदी गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला अन् त्याने उचललं टोकाचं पाऊल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More