बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, वाचा आकडेवारी

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात एकूण 392 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकूण 502 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी काहिशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 5 हजार 897 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 97 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकूच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत होती. मात्र, मुंबईतील रुग्णसंख्या मागच्या काही दिवसात हळूहळू कमी झाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

आसिफ खान आणि रसिका आडगावकारचा विवाहसोहळा धुमधडाक्यात संपन्न

‘गरज भासल्यास अमित शहांसोबत बोलणार’; कोकणातील पूर परिस्थितीवर नारायण राणेंची प्रतिक्रिया 

आनंदाची बातमी! राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर, वाचा आजची आकडेवारी

राज कुंद्रा प्रकरणातील अभिनेत्री गहना वशिष्ठचा नवा धक्कादायक दावा

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More