बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेची मोठी चाल; जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात उमेदवार ठरला!

मुंबईप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा दिपाली सय्यद यांनी गुरूवारी रात्री शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना त्यांच्या नावाची घोषणा करणार आहे. साहजिकच दिपाली सय्यद यांना जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान असणार आहे.

मुंब्रा कळवा मतदारसंघातील जातीय समीकरणे लक्षात घेता शिवसेनेने सय्यद यांना पक्षात घेऊन मोठी चाल खेळली असल्याची चर्चा आहे. मुस्लिम मतदारांचं प्राबल्य असलेला मतदारसंघ म्हणून कळवा-मुंब्रा मतदारसंघ ओळखला जातो.

शिवसेनेने दिपाली सय्यद यांच्या नावाची आणखी अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतू आज घोषणा होऊन त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि दिपाली सय्यद हे दोघेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More