बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशिकमध्ये नियम मोडणाऱ्या दुकानदारांकडून तब्बल एवढ्या कोटी रुपयांचा दंड वसूल

नाशिक | कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतु, विविध भागांमध्ये दुकानदारांकडून या नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचं निदर्शनास आलं. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दुकानदारांवर झालेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात दंड वसूल झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिकमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन करून दुकानं सुरू ठेवणे, दुकान सुरू ठेवल्यानंतर सामाजिक अंतर न ठेवणे तसेच इतर राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दुकानदारांवर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई मार्च ते जून महिन्यादरम्यान करण्यात आली असून यामध्ये तब्बल 9 कोटी 38 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

संचारबंदीकाळात दुकानं उघडे ठेवणे तसेच विनामास्क वावरणे याव्यतिरिक्त शासनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड वसूल झाल्याने अनेकांच्या भुवया देखील उंचावलेल्या पाहायला मिळाल्या.

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू आटोक्यात येत असल्याने आता अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. परंतु, आता महाराष्ट्र अनलाॅकच्या दिशेने वाटचाल करत असताना पुन्हा लोकांनी गर्दी करून ठरवून दिलेल्या नियमांचं पालन नाही केलं, तर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील निर्माण होऊ शकतो.

थोडक्यात बातम्या

भारताची B-टीम श्रीलंकेविरूद्ध भिडणार; शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्याची शक्यता

मित्रांचा दुरावा नियतीला देखील अमान्य; तोंड न पाहण्याची शपथ विसरुन मित्राचा जीव वाचवला

राज्य शासनाच्या जाचक अटीमुळे 2 महिन्यांपासून 1500 रुपये मिळवण्यासाठी रिक्षाचालकांची धावपळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीत ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

जेव्हा छगन भुजबळ फडणवीसांना फोन करून म्हणतात, ‘आम्हाला मदत करा,आम्ही…’

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More