बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक, दगडफेक करत भाजपचं कार्यालय फोडलं

नाशिक | जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे याची जीभ घसरली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे.

नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयावर दगडफेक करत हे कार्यालय फोडलं आहे. शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली

नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केलेली असतानाच सांगलीतही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं.  शिवसैनिकांनी राणेंच्या पोस्टरला काळं फासून आपला निषेध नोंदवला. यावेळी शिवसैनिकांनी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. आजच नारायण राणे यांना अटक करुन कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं.

थोडक्यात बातम्या- 

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राणेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगावा”

तालिबानला झटका, पंजशीरच्या वाघांनी तालिबानच्या तावडीतून सोडवले ‘इतके’ जिल्हे!

सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, पुढे काय घडलं तर…- नितेश राणे

नारायण राणे-शिवसेना संघर्ष वाढणार; ‘कोंबडी चोर’ म्हणत शिवसेनेने राणेंना डिवचलं

“भान हरवलेल्या नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरतीकरुन शॉक दिला पाहिजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More