बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं

नाशिक | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदीचे आदेश वाढवले आहेत. त्यानुसार, फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानं आणि फळभाज्यांची दुकानं ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. नाशिकमध्येही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. परंतु, नाशिकमधुन आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3 हजार 749 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिलासादायक म्हणजे रुग्णवाढीच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण नाशिक जिल्ह्यात अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. 24 तासात तब्बल 5 हजार 206 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. त्यातच नाशिकमधून काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन गळतीमुळे 24 रूग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली होती. पण आता पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याने काही प्रमाणात दिलासादायक वातावरण निर्माण झालं आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 2 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. नाशिकचा हा आकडा दिलासादायक जरी असला तरी दररोज महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही 60 हजारांपेक्षा जास्त संख्येने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे.

थोडक्यात बातम्या –

राज्यातील ‘ही’ दुकानं आता आठवड्यातील 7 दिवस सुरू राहणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

पंढरपुर विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य आज ठरणार; चुरशीच्या लढतीत कोण होणार विजयी?

“ममता जिंकल्यास तो मोदी-शहांचा व्यक्तिगत पराभव ठरेल”

#सकारात्मक_बातमी! एकाच कुटुंबातील 11 जणांना कोरोना; अशी केली सर्वांनी कोरोनावर मात

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; रुग्णांसह मृतांची संख्याही लक्षणीय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More