FACT CHECK Top News देश

न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकले भगवान श्रीराम आणि राम मंदिराचे फोटो!

नवी दिल्ली | बुधवारी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रम सोहळा पार पडला. सध्या टाळेबंदी असतानाही सर्वांनी हा कार्यक्रम घरी बसून पाहिला. सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा केला होता. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर संपूर्ण जगाचे लक्ष होते.

अमेरिकेमधील न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर या मोठ्या डिजिटल बिलबोर्डवर भगवान श्रीराम आणि प्रस्तावित राम मंदिर यांचे ३ डी फोटो दिमाखाने झळकत होते. एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, भगवान श्रीराम यांचे सर्वात मोठे हाय डेफिनेशन (एचडी) फोटो डिजिटल डिस्प्लेवर प्रदर्शित केला होता.

न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरने आतापर्यंत लावलेल्या डिजिटल होर्डिंगपैकी हा जगातील सर्वात महाग होंर्डिंग आहे. तेथील आयोजकांनी सांगितले होते की, या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही आमच्या पध्दतीने खास आयोजन करणार आहोत. न्यूयॉर्कमध्ये ५ ऑगस्टच्या ऐतिहासिक क्षणाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे.

भारताच्या तिरंग्याचे सर्वात सुंदर चित्र आणि राम मंदिराचे चित्र आम्ही प्रदर्शित करणार आहोत. भारतासाठी आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी हा अनमोल क्षण आहे, अशी माहिती अमेरिकन भारतीय सार्वजनिक घडामोडी समितीचे अध्यक्ष जगदीश सेव्हानी यांनी बुधवारी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

देशात कोरोनाचा प्रकोप, गेल्या 24 तासांतली धक्कादायक आकडेवारी

कोविड रूग्णालयात भीषण अग्नितांडव!; 8 कोरोना बाधीत रूग्णांचा होरपळून मृत्यू

भूमीपूजन सोहळा पार पडताच शिवसेनेची मोठी घोषणा, संजय राऊतांना केलं ऐलान…

…म्हणून आईनंच मुलांसह स्वतःच्या हाताच्या धारदार ब्लेडनं नसा कापल्या; खळबळजनक घटना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या