बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पु्न्हा कोरोनाचा उद्रेक, एका दिवसात 10 रुग्णांचा मृत्यू

वाशिम | कोरोनाचा संसर्ग सगळीकडे कमी होताना दिसत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाल्याचं चित्र होतं, मात्र आता पुन्हा कोरोना डोकं वरक काढतो की काय?, अशी परिस्थिती काही शहरांमध्ये तयार झाली आहे. राज्यातील एका जिल्ह्यात एका दिवसात 10 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे.

राज्यातील वाशिम जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात आज 10 रुग्णांचा मृत्यू आज 335 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर आज 486 जणांना देण्यात आला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 11 दिवसात 79 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 4132 कोरोना रुग्ण आढळले. तर या दरम्यान 5728 रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत आढळले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 38,817 आहेत. सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2,854 असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 35,527 इतकी आहे.

होम आयसोलेशनच्या नावाखाली रूग्ण घरी राहतात मात्र काही बाहेर फिरत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे.

दरम्यान, बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद, रायगड, पुणे आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या-

अल्पवयीन मुलाला महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून मारहाण, पाहा व्हिडीओ

अचानक फ्लाईटमध्ये कपलने सुरू केलंं किसिंग त्यानंतर एअरहोस्टेसने केलं असं काही की….

हृदयद्रावक! माहेरचा निरोप घेणाऱ्या नववधूने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला जगाचा निरोप

“मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केल्यास कोणताही दुष्परिणाम होणार नाही”

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; जाणून घ्या

कौतुकास्पद! 5 रूपयांसाठीच्या अपमानामुळे आज ‘ती’ करतीय लोखोंचा व्यवसाय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More