स्त्री होण्यासाठी पुरूष करतायेत लिंग बदल; गुजरातमध्ये लिंगपरिवर्तनाचा वाढतोय ट्रेंड
अहमदाबाद | लाजेखातर दुहेरी व्यक्तीमहत्व लपवून ठेवणारे स्त्री पुरूष आपल्या समाजात असतात. तर काही समाजाची पर्वा न करता बिनधास्त लिंग परिवर्तन करून घेतात. तर काही लोक समाजाच्या भितीपोटी भावना दडवून ठेवतात. पण आता काही लोक समाजाचं दडपन विसरून मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.
गुजरातमध्ये सध्या पुरूष लिंग बदल करून घेण्याचा ट्रेंड चालू आहे. ज्या पुरूषांच्या मनात स्त्रीभावना प्रकट होत असतात ते पुरूष लिंग बदल करताना दिसत आहे. या प्रकियेमध्ये कॉस्मेटिक सर्जरी ही कृत्रिम पद्धतीने केली जाते. महिन्याभरात फक्त अहमदाबाद शहरात 20 पुरूषांनी लिंगबदल केल्याची माहिती समोर येत आहे. तर 2020-21 मध्ये 1000 हून अधिक लोकांनी ही शस्त्रक्रिया केली आहे.
अहमदाबादमध्ये 80 शस्त्रक्रिया करणारे प्लास्टिक सर्जन आहेत. मागील काही वर्षात लोक शस्त्रक्रियेसाठी विदेशात जात होते. पण आता ट्रेंड बदलतो आहे. यामध्ये सामान्य लोकांबरोबर डाॅक्टर आणि उद्योगपती आहेत. मोठ्या रूग्णालयासाठी या शस्त्रक्रियेसाठी 8 लाख रूपये लागतात.
मला माहिती आहे की मी कधीच मातृत्वसुख मिळवू शकत नाही. मात्र मला संसार करायचा आहे. मुलांना दत्तक घेऊन आईचे प्रेम देईन. मी 26 वर्षे पुरुष म्हणून राहिले. मात्र आता मला खरी ओळख मिळाली आहे, असं शस्त्रक्रिया केलेल्या देवांशी बजाज यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
उधारीचे पैसे मागणं पडलं महागात; विधवा महिलेसोबत घडली अत्यंत धक्कादायक घटना
गेल्या 10 दिवसांपासून जळतंय ओडिसाचं जंगल; हजारो प्राण्यांच्या जिवाला धोका
…अन् भर पत्रकार परिषदेत खासदारानं महिला आमदाराच्या गालाला लावला हात, पाहा व्हिडिओ
पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा पेच अखेर सुटला; ‘या’ तारखेपासुन परीक्षेला सुरूवात
लालूंच्या सुरक्षा रक्षकांनी पळवल्या गाद्या आणि उशा; रुग्णालयाची पोलिसांत धाव
Comments are closed.