अहमदनगर | प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील सर्व ३६ स्टाफ चे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक कर्नल डॉ प्रदीप ठाकूर यांनी दिली. प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे दि. ४ एप्रिल रोजी आलेल्या कोरोना संशयित रुग्ण तातडीच्या रुग्ण सेवा विभागात ट्रीटमेंट करिता आला असता प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या रुग्णाला तपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नगर येथे ऋग्नवाहिकेतून दाखल केले. रुग्नवाहिकेतून दाखल केले होते. मात्र सदर रुग्ण पुणे ससून रुग्णालयात पाॅझिटीव आल्यानंतर प्रवरा रुग्णालयातील ४० स्टाफ ला क्वारंटाइन केले होते.
जिल्हा प्रशासनामार्फत सूचना मिळाल्यानंतर ताबडतोब प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस प्रवरा आयसोलेशण हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले व त्वरित त्यांचे घशातून स्वाब घेऊन सिव्हिल हॉस्पिटल यांच्या मार्फत तपासणी करीता पाठविण्यात आले.
प्रवरा आयसोलेशन हॉस्पिटल मध्ये एकूण ४० लोकांना दाखल करण्यात आले. यात १६ डॉक्टर, १४ नर्सिंग, २ एक्स रे टेक्निशियन, ५ अटेंडट, १ ड्रायव्हर, १ वॉचमन, १ लिफ्ट ऑपरेटर यांचा समावेश आहे. यातील ३६ रुग्णाचे कोरोना अहवाल दि ८ एप्रिल रोजी प्राप्त झाले असून त्या कुणालाही कोरोना संसर्ग झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ४ रुग्णाचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे अशी माहिती प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रदीप ठाकूर यांनी दिली.
परिसरातील नागरिकांनी कोणतीही आरोग्याबाबत तक्रार असल्यास कोणतीही शंका न बाळगता उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी केले आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
गुटखा खाऊन पचापचा थुंकणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाला पोलिसांनी चोप चोप चोपला
मुंबईत वाढता कोरोनाबाधितांचा आकडा; महापालिका दक्षिण कोरियाकडून विकत घेणार 1 लाख किट्स
महत्वाच्या बातम्या-
मरकजमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला; केंद्राने कार्यक्रम परवानगी दिलीच कशी??- गृहमंत्री
कोरोना: पुण्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर तर रुग्ण संख्या २०४
‘या’ राज्याच्या सरकारनं लॉकडाउन वाढवला; देशातील पहिलं राज्य
Comments are closed.