पुणे | पुण्यातील पिंपरी येथे एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. येथे एका तरुणीच्या वर्गमित्रानेच तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित वर्गमित्राने तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून तिला आपल्या जाळ्यात ओढलं.
संबंधित आरोपी वर्गमित्राचं नाव राजकुमार नागराळी असं असून हा तरुण 25 वर्षांचा आहे. राजकुमार हा भोसरी येथे रहिवासी आहे. राजकुमार हा तरुणीचा वर्गमित्र आहे. राजकुमारने त्याच्या वाढदिवसानिमित्त तरुणीला निगडी परिसरातील एका हाॅटेलमध्ये नेलं. तेथे त्याने मित्राच्या ओळखपत्रावरुन रुम देखील बुक केली.
हाॅटेलवर नेल्यावर तरुणीने त्याला तिथं नेण्याचं कारण विचारलं. यावर राजकुमारने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर राजकुमारने तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यावरच आरोपी थांबला नाही तर या प्रकारानंतर राजकुमार तरुणीला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जात असे.
दरम्यान, वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या रुम घेऊन राजकुमार तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवायचा. मात्र तरुणीने त्याला लग्नाबद्दल विचारल्यावर राजकुमारने तरुणीला बेदाम मारहाण केली. यानंतर तरुणीने राजकुमार विरोधात तक्रार नोंदवली. डिसेंबर 2018 ते मे 2021 पर्यंत हा प्रकार चालू होता. मात्र आता पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
थोडक्यात बातम्या-
विवाहीत गर्लफ्रेंडसोबत तरुणाची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर
चिमुकल्याला झोप यावी म्हणून डॉक्टरांनी गायलं सुंदर गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
‘…नाहीतर मेडिकल दुकानदार संपावर जाणार’, राज्य सरकारला दिला 5 दिवसांचा अल्टीमेटम!
‘द बेस्ट ऑस्कर एव्हर’ म्हणत राम गोपाल वर्मांनी उडवली नरेंद्र मोदींची खिल्ली
सोनूने कहर केला, 13 मुलांना नादी लावून लग्न केलं अन्…
Comments are closed.