पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांमधला वाद पेटला, भावाविरोधात फिर्याद दाखल
पुणे | शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी खासदार अमोल कोल्हे यांचे भाऊ सागर रामसिंग कोल्हे यांच्यावर काल मंचर पोलिस ठण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर नाव देण्यावरुन कोल्हे यांनी फक्त नामकरण केल्याने काय साध्य होणार आहे. अशी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना जनतेने ट्रोल केले होते. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला राज्याची मंजूरी मिळाल्याने डाॅ.कोल्हे यांनी श्रेयासाठी केलेल्या प्रयत्नांना सोशल मीडियावर लोकांनी जबरदस्त ट्रोल केले होते. त्या कामाचे श्रेय आढळराव पाटील यांना दिल्याने खासदार कोल्हे यांचे मानसिक संतलून बिघडलं, असं मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे म्हणाले,
त्यांनी त्यांचा सख्खा भाऊ सागर रामसिंग कोल्हे यांच्याकडून आढळराव पाटील यांची बदनामी सोशल मिडीयाद्वारे सुरु केली आहे. सागर कोल्हे यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे, असंही वांजळे म्हणाले
दरम्यान, आढळराव पाटील यांची खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा वांजळे यांनी दिला.
थोडक्यात बातम्या –
बाळासाहेबांच्या 400 कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रूग्णालय उभारा- इम्तियाज जलील
सख्ख्या मुलीने आईला दगडावर आपटून मारून टाकलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
‘ही तर लोकशाहीची चेष्टा’; सर्वोच्च न्यायालयानं भाजप सरकारला फटकारलं
हवेत उडणारे सोनेरी कासव पाहून लोकं झाले चकित, पाहा व्हीडिओ
अभी तो हम जवान है!; 80 वर्षाच्या दोन तरुणांच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Comments are closed.