पुणे महाराष्ट्र

भवानी पेठेने कोरोनाला हरवलं… पुण्यात रूग्णसंख्येत दहाव्या क्रमांकावर

पुणे | कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाकडे आजपर्यंत पाहिले जात होते. परंतू गेल्या महिन्याभरात ही ओळख पुसण्यास कार्यालयाला यश आलं आहे. एकेकाळी क्रमांक एकवर असलेल्या या कार्यालयाने घरटी सर्व्हेक्षण… सर्दी ताप खोकला असेल तर तातडीने उपचार अशा उपाययोजना राबवल्या.

त्यामुळे नव्याने नोंद होणाऱ्या संख्येत भवानी पेठ आता चांगलीच मागी पडली आहे. भवानी पेठ आता दहाव्या क्रमांकावर घसरली आहे. सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या 121 आहे. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशासनाचं उत्तम काम याला कारणीभूत ठरलं आहे.

पुण्यात कोरोनाचा पहिला रूग्ण 9 मार्च रोजी आढळला त्यास तीन दिवसांनी तीन महिने होत आहेत. या तीन महिन्यात पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या साडे सात हजाराहून अधिक झाली आहे.क्षेत्रिय कार्यालयनिहाय रूग्णांची संख्या दररोज प्रसिद्ध केली जात आहे.

दरम्यान, सध्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात सर्वाधिक रूग्णसंख्या आहे. उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील तिथे मोठी आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“… आणि ट्रोल करणाऱ्यांना बंगल्यावर नेऊन झोडणारे पहिले मंत्रीही तुम्हीच”

रायगड जिल्ह्याला 100 कोटी रुपये मदत तोकडी ठरेल- देवेंद्र फडणवीस

महत्वाच्या बातम्या-

दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का?; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

लॉकडाऊन काळात भुजबळांचं खातं ‘अ‌ॅक्टीव्ह’, अन्न नागरी पुरवठा विभागाचा अन्नधान्य वाटपात विक्रम

कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या