बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Corona: उद्यापासून पुणे शहरात ‘या’ निर्बंधांचं करावं लागणार पालन

पुणे | राज्यात कोरोनाचे रुग्ण (Corona Patients Increased) पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी एक बैठक घेतली होती. यावेळी अजित पवारांनी नवीन निर्बंध जाहीर केले आहेत. उद्यापासून या निर्बंधाचं पालन करणं नागरिकांसाठी बंधनकारक असणार आहे.

पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा उद्यापासून  बंद राहणार आहेत. ऑनलाईन शाळा पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. मात्र, नववी आणि दहावीचे वर्ग सुरु राहतील. पुन्हा एकदा मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे. जर कोणी मास्क घातलेला नसेल. तर व्यक्तीकडून 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

नागरिकांना आता लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक असणार आहे. जर कोणी लसीचे दोन्ही डोस घेतले नसतील तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. हॉटेल, शासकिय कार्यालय, मॉल अशा सर्वचं ठिकाणी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचं सर्टीफिकेट दाखवावं लागणार आहे. दोन्ही डोस घेतले नसतील तर प्रवेश नाकारला जाणार आहे.

दरम्यान, पुण्यात 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या दरम्यान रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पाच ते सात दिवसात पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या चारपटीने वाढली आहे. पुण्यात सोमवारी 444 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 2838 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर…”; स्टोरी ठेवत तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

“सरकारच्या हातालाच नव्हे तर बुद्धीलाही लकवा मारलाय”

‘या’ प्रसिद्ध कंपनीचे फोन आजपासून होणार बंद, वाचा सविस्तर

राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युती?; शिवसेना मंत्र्याचं मोठं वक्तव्य

पुणे जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, पण अजित पवारांना मोठा धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More