Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात नवरदेवाच्या बापानं चक्क मेव्हणीचेच दागिचे चोरले, अन् लग्नात…

पुणे | ‘पुणे तिथे काय उणे’, या म्हणीप्रमाणे पुण्यात काहीना काही अचंबित करणाऱ्या घटना घडत असतात. मात्र एका लग्नात नवरदेवाच्या बापानेच आपल्या मेव्हणीचे दागिने चाेरल्याचा प्रकार घडला आहे.

दत्ता दगडू गोरे, असं नवरदेवाच्या बापाचं नाव आहे. विवाह वडगावमधील धबाडीवस्तीमध्ये होता. फिर्यादी गोरे या आरोपीच्या मेव्हणी लागतात. त्यासुद्धा लग्नासाठी आल्या होत्या.

काही वेळाने हळदीच्या कार्यक्रमाला जायचं होतं. म्हणून त्यांनी दागिने आपल्या भावाच्या घरी सुरक्षित म्हणून ठेवले. भावाच्या घरात कपाटात ठेवले होते. त्यानंतर मात्र सर्वजण हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. वरबापाने याचाच फायदा घेत आपल्या मेव्हणीच्या भावाच्या घरी जात कपाटातील 2 लाख 42 हजारांच्या दागिन्यावर डल्ला मारला.

दरम्यान, चोरी झाल्याचं लक्षात आल्यावर लग्नात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांनी सिंंहगड रोड पोलिसांकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी आपल्या पद्धतीने अवघ्या 4 तासात ही चोरी उघडकीस आणली आहे. आरोपी गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा’; प्रकाश आंबेकरांची मागणी

सर्वात मोठा निकाल!! गुटखा विक्री करणाऱ्याला आता 10 वर्षे शिक्षा!

‘शेतकरी आंदोलनामुळे ‘बर्ड फ्लू’ पसरत आहेत’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

50 वर्षीय विधवेवर सामूहिक बलात्कार; नराधमांनी केलेला प्रकार ऐकून काळजाचा थरकाप उडेल

‘संभाजीनगर हा शिवसेनेचा विषय’; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या