पुणे | पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. सासऱ्यानेच आपल्या सुनेची सुपारी दिली होती मात्र यामध्ये सासऱ्याला आपलात जीव गमवावा लागला आहे.
विनायक भिकाजी पानमंद, असं खून झालेल्या सासऱ्याचं नाव आहे. नक्की सुपारी देण्याचं कारण काय तर सासरे विनायक पानमंद यांचा मुलगा अजित याचा विवाह झाला होता मात्र त्याने दोन वर्षापुर्वी घरच्यांना माहिती न देता प्रेमविवाह केला होता. याबाबत अजितच्या वडिलांना माहिती झाली त्यामुळे त्यांच्यामध्ये नेहमी खटके उडू लागले.
त्यानंतर सासरे विनायक यांना आपल्या मुलाचा पहिला संसार मोडल्याचं त्यांच्या मनात दु:ख होतं. त्यांनी आपल्या सुनेचा खून करण्याचा कट रचला. यामध्ये त्यांनी आरोपी अविनाश बबन राठोड, मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू आणि मोहम्मद वसीम जब्बार यांना 1 लाख 34 सुपारी दिली होती.
दरम्यान, आरोपींनी गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये जाऊन दोन पिस्तुल आणले. मात्र महिलेला मारण्यासाठी ते घाबरत होते. पण सासरे हे आरोपींना म्हणाले खून करता येत नसेल तर पैसे परत द्या. त्यानंतर विनायक हे पैसे परत मागत असल्याने आरोपींनी खेडमधील वराळे येथे बोलावून त्यांचा गळा दाबून त्यांचा खून केला. आरोपींमधील मोहम्मद वसीम जब्बार हा फरार असून पोलीस तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीला धडक देण्यासाठी निघाले बच्चू कडू; रस्त्यात दिसलं ‘हे’ भावस्पर्शी चित्र
कृषी बिल शेतकऱ्यांच्या फायद्याचंच, त्यांनी आंदोलन थांबवावं- रक्षा खडस
सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर
“महाविकास आघाडीचे सरकार सांगून पाडणार नाही तर थेट कृती करणार”
‘राज ठाकरेंना निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, पण…’; शरद पवार
Comments are closed.