बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र पुण्यात आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात ३,२६० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ३,३०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ८३ जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर १९ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या १,४१५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४,३६,३४९ इतकी आहे. तर पुण्यात 3९,७३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण ७,११८ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत ३,८९,४९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज १९,७९० जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

कडक सॅल्यूट! पंक्चर काढणाऱ्या 60 वर्षीय नागरिकाने दिले 90 ऑक्सिजन सिलेंडर

हृदयद्रावक घटना, एकुलत्या एक मुलाचा कोरोनानं मृत्यू झाल्याचं कळताच आईनेही सोडले प्राण

“मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही केंद्राची इच्छा आहे का?”

अखेरच्या श्वासापर्यंत दिली साथ; पतीच्या मृतदेहाला मिठी मारून पत्नीने सोडला जीव

“मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका NCP स्पॉन्सर्ड”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More