बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

पुणे |गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या कमी करण्यासाठी आता यश येताना दिसत आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 2589 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 4046 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 79 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं आहे. यातील 18 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1411 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 430210 इतकी आहे. आत्तापर्यंत एकूण 6,991 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 3,82,518 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 12276 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात  रमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवडा येणारा पाच दिवसात कमी होईल आणि पाच दिवसात मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा राज्यात उपलब्ध होणार असल्याचं स्वतः आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ …तर CT-SCAN करू नका’, एम्सच्या संचालकांनी दिला महत्वाचा सल्ला

ममता बॅनर्जी यांची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड; 5 मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

‘आमच्याशी असं वागण्याची तुमची हिंमत कशी झाली?’; आयपीएल समालोचकाचा पंतप्रधानांना सवाल

‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला…’; अदर पुनावाला यांनी दिलं स्पष्टीकरण

मराठी चित्रपटसृष्टीला धक्का! फर्जंद, फत्तेशिकस्तमधील कलाकाराचा कोरोनामुळे मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More