Top News महाराष्ट्र रायगड

रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळून अपघात!

मुंबई | रायगड जिल्ह्यातील कुडपण धनगरवाडी गावाजवळ भीषण अपघातात घडला आहे. वऱ्हाडचा ट्रक 300 फुट दरीत कोसळला आहे. यात अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.

संध्याकाळी साधारण 6.30 च्या सुमारास वऱ्हाड्यांचा ट्रक रत्नागिरीतून पोलादपूर येथे जात होता. कुडपण धनगरवाडी जवळील अपघाती वळणावर अपघात झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. अंधार झाल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

ट्रकमध्ये 20 ते 25 लोक असल्याची माहिती आहे. अपघातामधील जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी घटनास्थळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान, या अपघातात किती जणांती मृत्यु किंवा किती लोक जखमी झाले आहेत. याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकली नाही.

थोडक्यात बातम्या-

“संभाजी महाराज आमचं आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान”

उत्तर प्रदेशातील महिला अत्याचारांविरोधात राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात घंटानाद आंदोलन!

धक्कादायक! मुंबईमध्ये 19 वर्षीय तरुणावर सामूहिक बलात्कार

नाद करा पण जडेजाचा कुठं! आपल्या रॉकेट थ्रोने शतकवीर स्मिथला दाखवला तंबुचा मार्ग; पाहा व्हिडीओ

कांगारूंच्या धरतीवर रोहित शर्माचं नाणं खणखणलंच; ‘हा’ विक्रम केला नावावर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या