नवी दिल्ली | ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजमध्ये प्रवेश करून काँग्रेसमध्ये खळबळ उडवून दिली. मध्य प्रदेशात झालेल्या भूकंपाचे धक्के आता राजस्थान काँग्रेसमध्ये बसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या संपर्कात भाजपचे काही प्रमुख नेते असल्याच्या चर्चा आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात सर्व काही आलेबल नसल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे. बऱ्याच वेळा त्यांच्यात विसंवाद असल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. याचाच फायदा घेण्याचा राजस्थान भाजपचा विचार आहे.
राजस्थान काँग्रेसने मात्र या चर्चांचं खंडन केलं आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे अतिशय चांगलं काम करत आहेत. त्यांच्या कामाने ते राजस्थानला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे. या चर्चांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं मंत्री विश्ववेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये जे झालं ते व्हायला नको होतं. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारख्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करायला नको होता. त्यांच्या भाजप प्रवेशाने मला वैयक्तिक दु:ख झालं आहे, असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा 18 रोजी
कौतुकास्पद! वडिलांसोबत दुकानात काम करत शुभम गुप्ता झाला IAS
महत्वाच्या बातम्या-
कोरोनामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक सभा रद्द
‘पाच बॉयफ्रेंड असणं ही मुलीची मर्जी’; स्पर्धकाला झापणारी नेहा धुपिया सोशल मीडियावर ट्रोल
विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्या; सक्षणा सलगर यांची मागणी
Comments are closed.