Top News देश राजकारण

सचिन पायलट यांना मोठा धक्का; परतलेल्या 3 आमदारांचं धक्कादायक वक्तव्य

जयपूर | राजस्थानमधील उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेसमध्ये बंड करत काही आमदारांसह दिल्ली गाठली आहे. मात्र त्यांना धक्का देणारी घटना आज घडली आहे. दिल्लीवरुन परतलेल्या तीन आमदारांनी आपला अशोक गहलोत यांना पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे.

सचिन पायलट यांचे मित्र दानिश अबरार, चेतन डूरी आणि रोहित बोहरा अशी या तीन आमदारांची नावं आहेत. हे तिघेही दिल्लीला गेले होते, जयपूरला परतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन गहलोत यांना पाठिंबा दिला.

आपण आपल्या व्यक्तिगत कामांसाठी दिल्लीला गेल्याचं या आमदारांनी जाहीर केलं आहे. दानिश अबरार म्हणाले, माझं कुटुंब दिल्लीला राहतं. त्यामुळे मी दिल्लीला गेलो होतो. चेत डूडी यांनी व्यवसायाच्या संदर्भात तर रोहित बोहरा यांनी मुलांना भेटण्यासाठी दिल्लीला गेल्याचं जाहीर केलं आहे.

सचिन पायलट यांच्या गटातील तीन आमदारांनी अशा प्रकारे यूटर्न घेतल्यानं पायलट यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेससाठी हा मोठा विजय मानला जात आहे कारण हे तिघे सचिन पायलट यांचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात.

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांनी एनडीएमध्ये येऊन नरेंद्र मोदींसोबत काम करावं, केंद्रीय मंत्र्याचं निमंत्रण

संजय राऊतांचं भाजपला ओपन चॅलेंज; “हिंमत असेल तर महाराष्ट्रात ‘हे’ करुन दाखवा!”

‘तुला मनसे सांगणं आहे…’, रूपाली पाटील यांनी केतकी चितळेला सुनावले खडे बोल

कार्यकारी अध्यक्ष होताच हार्दिक पटेलांनी केलं चुकीचं ट्विट, ट्रोल झाल्यावर केलं डिलीट

दया नायकांनी पकडलेल्या विकास दुबेच्या हस्तकांना एन्काऊंटरची भीती, केली ‘ही’ मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या